Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: prashant balkrishna kulkarni
Added on: 23-Mar-2010
Description: बाजीरव रस्त्यावरील अभिनंदन स्वीट मधील पाटी
English Translation: do one thing! bring your own sack from next time!
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (24 votes cast)


 
On 30-Mar-2010 , Pranav Jatkar said,
पुणेकराच्या पूर्वीच्या पोषाखात छत्री बरोबर एक पट्ट्यापट्ट्यांची कापडी पिशवीपण असे.त्या आता परत दिसू लागतील बहुदा.. तसेच वाहतुकीची कोंडी, प्रदुषण, पार्किंग प्रॉब्लेम्स यामुळे पुणेकराची सायकलपण परत येईल असे वाटते. आत्ताचे तरुणांचे पुणे, तेच तरुण इथेच स्थाईक झाल्याने २५ वर्षांनी पुन्हा पेन्शनरांचे पुणे होते की काय मग?
 
On 30-Mar-2010 , Sudhir said,
आम्ही कागदी पिशावी देणार नाही. पण तुम्ही कापडी पिशवी का आणली नाही म्हणून अपमान जरुर करू.
पृथ्वी वाचवायचे सगळे उपाय तुम्ही करा. शिवाजी तुम्ही जन्माला घाला आणि मोठा करा. आम्ह उपदेशाच्या पाट्या लावू.
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
"मला तुम्हाला पिशवी देणे परवडत नाही" हा साधा आशय व्यक्त करण्यासाठी या बाबाने अगदी वसुंधरेला गवसणी घातली आहे!
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
बर सांगायची गम्मत म्हणजे या दुकानाचा मालक मूळचा राजस्थानी आहे बरका! बघा सदाशिव पेठेत राहून पठ्ठे कसे तयार होतात ते! त्यांचही बरोबर आहे हो! रोज सदाशिव पेठी ग्राहकांशी गाठ!!!शेवटी पाण्यात राहून माशासारखे पोहायला शिकले म्हणायचे!!!
 
On 31-Mar-2010 , ankush said, Star Poster
प्रदुषण, पृथ्वी, व पिशावी ह्यांची सांगड लावनारे आनखी एक समीकरन विनंती च्या नावाखाली खपतेय... हे कॅरीबंग्ज चा आग्रह न धरनारे पुणेकर आता चांगलेच जानतात !
 
On 31-Mar-2010 , Ninad said,
स्वता सांगता की प्लास्टिकचा वापर करू नका आणि स्वता मात्र पत्र्याचा बोर्ड लावायचा सोडून कागदावर प्लास्टिकचा पेपर लावला आहे. शहान्यांनी!
 
On 03-Apr-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
कँरी बँग मागु नका. स्वतःला, पृथ्वीला वाचवा व माझे कँरीबँगचे पॅसे वाचवा. कापडी पिशवी नसेल तर आमच्याकडुन विकत घ्या.
 
On 20-Apr-2010 , ashu said,
अहो पन ति सुचाना त्याने plastic madhe chitkavli ahe....loka sange brahma gyan apan matra korde pashan....
 
On 22-Apr-2010 , Kesu said, Star Poster
कापडी पिशवीतून रसगुल्ले कसे घेउन जाणार हलवाई काका!?
 
On 23-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
कृपया रसगुल्ले इथेच खावेत...पार्सल मिळणार नाही...
 
On 04-May-2010 , ash said,
त्यापेक्शा तुम्हि अम्हला मिथाइ बरोबर कापदि पिश्वि द्या ना
 
On 13-May-2010 , Kshitij Desai said,
'प्रिय ग्राहकांस' असे लिहून पाटी व्यर्थ घालवली आहे. दुकानदाराच्या लेखी प्रिय ग्राहक कोण असतात ?
 
On 14-Jul-2010 , ankush said, Star Poster
अभिनंदन -त्या प्रदुषणाबद्दल सुचवल्याबद्दल.
(पेढे वाटता ना तुमची स्तुती केल्याबद्द्ल?)
------
आम्हाला? -ह्या पुणेकरांना ऊपदेश देता तुम्ही?
अहो, आपण मात्र पाटीला पण प्लॅस्टीकच्या कवचामधे सुरक्षीत केलेय त्याच काय?
ते कापडी पिशव्याबद्दल का सुचवता तुम्ही 'उपाय' आम्हाला?
आमचा उपाय मान्य कराल का?
तुमच्या त्या कॅरीबेगच्या बजेट मधुन का नाही तलम कापडं आणून आम्ह्याला पार्सल देत? अहो, लागु द्या ना तुमचापण हातभार त्या प्रदुषणावर आळा घालण्यात!
 
On 23-Jul-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
सरळ सांगा ना कँरी बँग मिळणार नाही. हे सांगायला उगाच पृथ्वी, प्रदुषण यांचा आधार कशाला घेता.
 
On 26-Jul-2010 , Nilesh Ashok Patil said,
जे अप्रिय ग्राहक अहेत त्यान्च्याकरिता काय?
 
On 27-Aug-2010 , kiran Ahire said,
स्वतः सांगता की प्लास्टिकचा वापर करू नका आणि स्वतः मात्र रोज दुकानाचा कचरा (ओला-सुका) वेगळा न करता प्लास्टिकच्या पिशवीत भरुन रस्ताच्या कडेला ठेवतात त्याचे काय?... सरळ साग़ ना "मला तुम्हाला पिशवी देणे परवडत नाही"
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
loka saangeee............................!!!!! tyatla prakar ha....swatala hi suchna detana plastic cha moh awarla nahi ani var girhaikala shikvatoy ha !!!
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required